शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त पालिकेच्या वतीने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गुणवंताचा कामगारांचा सन्मान शहरातील वेगवेगळ्या आस्थापनेतील 16 गुणवंताचा समाजाप्रती केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन कामगार कल्याण मंडळ दरवर्षी”गुणवंत कामगार” पुरस्काराने सन्मानित करण्यात येते या सर्व पुरस्कारार्थिचा 2015 व 2017 मधील गुणवंताचा सन्मान पालिकेच्या वतीने करण्यात आला.
यावेळी गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे कार्याध्यक्ष व कामगार नेते केशव घोळवे यांनी मनपाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी गुणवंताचा सन्मान होण्यासाठी पाठपुरावा केल्यामुळेच शक्य झाल्याचे मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी सांगितले.
गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे सचिव राजेश हजारे यांनी ही पालिकेत सतत पाठपुरावा केला.
पाच दिवसापूर्वी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रती व कामगार कल्याण मंडळाने मा.आयुक्त यांना गुणवंताचा सन्मान वर्धापन दिनी व्हावा म्हणून निवेदन देण्यात आले होते याची दखल पालीकेने घेऊन सन्मान करण्यात आल्याचे जोगदंड यांनी सांगितले.
यावेळी पालिकेच्या सफाई कामगार,पहिल्या स्वतंत्र दिनाचे साक्षीदार असणारे शहरातील जेष्ट नागरिक,अग्निशमन दलाचे कर्मचारी, विविध सामाजिक संस्थेचा पण सन्मान करण्यात आला. सा.का.स्वानंद राजपाठक,डॉ मोहन गायकवाड, हनुमंत माळी, राजेश हजारे ,मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रती या संस्थेच्या पदाधिकारी यांचा ही सन्मान करण्यात आला.
यावेळी पालिका आयुक्त राजेश पाटील, महापौर माई ढोरे ,उपमहापौर हिराबाई घुले,सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे,स्थायी समिती अध्यक्ष अँड नितीन लांडगे, गटनेते राहुल कलाटे,राजू मिसाळ, गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मुलानी कार्याध्यक्ष व कामगार नेते केशव घोळवे,सचिव राजेश हजारे, आण्णा जोगदंड,अनेक नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी विविध आस्थापनेतील 16 गुणवंत कामगारांचा सन्मान झाल्यामुळे सर्व गुणवंत कामगार आनंदी होते. तसेच शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे शहरातील पहीले गुणवंत कामगार पुरस्कार मिळणारे दापत्य असलेले आण्णा जोगदंड व संगिता जोगदंड यांचा ही पालिकेच्या वतीने सन्मान करण्यात आला.