शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरातील युवानेते विशाल नंदुशेठ बारणे यांच्या वतीने थेरगाव परिसरात कुमारी पूजन सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यास विशाल नंदुशेठ बारणे लहान कुमारी यांना भेटवस्तू देत त्यांचे परंपरागत रीतीने पूजन केले.
याप्रसंगी आपल्या प्रतिक्रिया देताना विशाल बारणे यांनी आपल्या भावना व्यक्त व्यक्त केल्या. कुमारी पूजन सोहळ्याबद्दल सर्व माता-भगिनींना माझा प्रणाम.. नवरात्री म्हणजे स्त्रीशक्ती आराधनेचा व नऊ सृजन नवनिर्माणाचा उत्सव या मंगलमय उत्सव काळात कुमारी पूजन हा विशेष महत्त्व असलेल्या पूजन विधी मानला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक स्त्रीमध्ये आदिशक्ती दुर्गा माता वास करते असे मानले जाते. आदिमायेच्या नऊ रूपांपैकी कुठल्यातरी रूपाचे प्रतिबिंब प्रत्येक स्त्रीमध्ये असते. आजची कुमारी बालिका हे देशाचे उज्ज्वल भविष्य आहे. त्यांच्यामध्ये देशाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे सामर्थ्य दडले आहे. त्यांच्यातील या सामर्थ्याला आपण सर्व मिळून बळ देण्याची आज गरज आहे. त्यातूनच आपल्या देशाची सामाजिक, राजकीय,आर्थिक अशी सर्वांगीण प्रगती साधणारी उद्याची समर्थ स्त्री घडणार आहे. नवसृजनाच्या या उत्सवात उद्याच्या शिल्पकार असलेल्या या दुर्गामातेचे साक्षात रूप असलेल्या सर्व कुमारी बालिकांना मी शतश नमन करतो. या प्रसंगी परिसरातील अनेक महिला, युवक- युवती व कुमारी बालिका उपस्थित होत्या. सर्व कुमारी बालिकांना या निमित्ताने नमन करून भेटवस्तू देण्यात आल्या, व हा उत्सव प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला.