पिंपरी दि.१५ ऑक्टोबर २०२१- भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे जागतिक किर्तीचे थोर शास्त्रज्ञ होते. देशाच्या संरक्षणासाठी त्यांनी केलेल्या विविध प्रक्षेपण अस्त्रांच्या संशोधन आणि निर्मितीमुळे भारतीय लष्कराची ताकद वाढुन जगभरात स्वतंत्र ओळख निर्माण झाली असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
माजी राष्ट्रपती भारतरत्न,डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांचे पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस महापौर माई ढोरे यांनी पुष्षहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले,अतिरीक्त आयुक्त्त विकास ढाकणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
Advertisement