माजी विरोधी पक्ष नेते नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शीतल काटे यांच्यावतीने शरद पवार यांचे होत आहे जल्लोषात स्वागत
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्या करिता शरद पवार पिंपरी-चिंचवड शहरात आगमन करत असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील विद्यमान नगरसेवक माजी विरोधी पक्षनेते नाना काटे व नगरसेविका शीतल विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्यावतीने चिंचवड विधानसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे भव्य स्वागत करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे स्वागत करणारे फ्लेक्स संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदार संघात झळकले आहेत.
येणार आधारवड स्वागत करते पिंपरी-चिंचवड, स्वागत साहेबांचे आयटी पार्क सुरू करणाऱ्या दूरदृष्टीचे, WELCOME TO THE VISIONARY BEHIND HINJEWADI IT PARK अशा प्रकारचे स्लोगन वापरून केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे स्वागत करण्यात येत आहे. संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघात नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्यावतीने हे स्वागताचे फलक लावण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.