शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या भोसरी रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे लोकार्पण आज देशातील गोरगरिबांचे आधारस्तंभ लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या अतिदक्षता विभागासाठी कॅपजेमिनी इंडिया सॉफ्टवेअर कंपनी यांनी महापालिकेला विशेष सहकार्य केले. जनसेवक रवी बाबासाहेब लांडगे यांच्या मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला आज यश आले असून या लोकार्पणाच्या वेळी खासदार अमोल कोल्हे तसेच माजी आमदार विलास लांडे, अजित गव्हाणे, संजय उदावंत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .
या रुग्णालयाच्या माध्यमातून वंचित शोषित वर्गाच्या उद्धारासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू. असे मत यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, मनपा विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ आदी उपस्थित होते.