शहरभर होत आहे या फ्लेक्सची चर्चा
शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत आज पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा थोपटे लॉन्स रहाटणी येथे होणार असून, संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात शरद पवार यांच्या स्वागताचे फ्लेक्स झळकले आहेत. यातच एक फ्लेक्स असा आहे जो शरद पवार यांना देवाचे स्वरूप म्हणून दर्शवित आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील विद्यमान नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्यावतीने शरद पवार यांच्या स्वागतासाठी लावलेल्या फ्लेक्स मध्ये ‘आज विठ्ठल येणार विठ्ठलाच्या घरी’ या आशयाचे फ्लेक्स रहाटणी मध्ये लागले आहे.
आज या मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा, अनेकांचे श्रध्दास्थान शरद पवार नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या घरी सदिच्छा भेट देणार आहे. यावरूनच ‘आज विठ्ठल येणार विठ्ठलाच्या घरी’ असे प्लेक्स नाना काटे यांच्या वतीने लावण्यात आले आहे.
विठ्ठल हे सर्वांचेच श्रद्धास्थान असलेले या विठ्ठलाच्या जागी शरद पवार यांना जागा देत नाना काटे यांनी आपले श्रद्धा स्थान शरद पवार हे असल्याचे या फ्लेक्स द्वारे सांगितले आहे. या फ्लेक्स ची सर्वत्र पिंपरी-चिंचवड शहरभर चर्चा होत आहे.