शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
नोव्हेंबर 2021 मध्ये होणा-या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या निवड चाचणी स्पर्धा गुरुवारी (दि. 14 ऑक्टोबर) रहाटणी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी माती विभाग खुला गटातून भोसरीचा पै. समाधान दगडे आणि गादी विभागातून चिंचवडचा पै. सुयश गोरे यांची निवड झाली.
रहाटणी येथे झालेल्या या स्पर्धेच्या आखाड्याचे पुजन पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे आणि माजी नगरसेवक कैलास थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व विद्यमान नगरसेवक नाना काटे, पै. दिलीप बालवडकर, पै. अर्जुन काटे, पै. भारत श्री विजय गावडे, पै. वाल्मिक कुटे, पै. संतोष माचुत्रे, पै. धोडिंबा लांडगे, पै. काळूराम कवितके, पै. दिलीप आप्पा काळे, पै. विशाल आप्पा कलाटे आदींसह पै. माऊली कुटे, पै. किशोर नखाते, पै. विजय कुटे, पै. निवृत्ती काळभोर, पै. बाळासाहेब काळजे, पै. विजय नखाते, पै. शाम बालवडकर, पै. सुरेश वाळुंज, पै. संभाजी लांडगे, पै. पप्पू काळभोर, पै. नवनाथ नढे, पै. अजय लांडगे, पै. बबन बो-हाडे, पै. पंडीत मोकाशी, पै. अजय लांडगे, पै. अभिषेक फुगे आदी उपस्थित होते.
या निवड चाचणी स्पर्धेचे निवेदन हंगेश्वर धायगुडे तर पंच म्हणून मोहन खोपडे, रोहिदास आमले, संदीप वांजळे, निलेश मारणे, तुषार गोळे यांनी काम पाहिले. नोव्हेंबर 2021 रोजी होणा-या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाकडून पुढील पैलवानांची निवड करण्यात आली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे : माती विभाग – महाराष्ट्र केसरी खुला गट – 86 किलो ते 125 किलो – विजयी समाधान दगडे (भोसरी) विरुध्द प्रतिक चिंचवडे (चिंचवड) ; 57 किलो गट – विजयी संकेत माने (आकुर्डी) विरुध्द जय वाळके (दिघी) ; 61 किलो गट – विजयी ऋतिक नखाते (रहाटणी) विरुध्द रामेश्वर शिंदे (चिंचवड) ; 65 किलो गट – विजयी गणेश लिम्हण (थेरगाव) विरुध्द वेंकटेश देशमुख (चिखली) विरुध्द (थेरगाव) ; 70 किलो गट – विजयी अविनाश माने (आकुर्डी) विरुध्द यशराज अमराळे (च-होली) ; 74 किलो गट – विजयी सिध्दार्थ लांडे (भोसरी) विरुध्द अनिकेत लांडे (भोसरी) ; 79 किलो गट – विजयी पवन माने (आकुर्डी) विरुध्द विकी लोखंडे (पिंपळे गुरव) ; 86 किलो गट – विजयी यश नखाते (रहाटणी) विरुध्द अक्षय अडागळे (पिंपरी) ; 92 किलो गट – विजयी शुभम गवळी (भोसरी) विरुध्द राजन मते (दापोडी) ; 97 किलो गट – विजयी धनजय शेळके (पिंपरी) विरुध्द अक्षय करपे (चिखली) ; गादी विभाग – महाराष्ट्र केसरी खुला 86 किलो ते 125 किलो प्रथम क्रमांक विजयी सुयश गोरे (चिंचवड) विरुध्द संकेत घाडगे (आकुर्डी) ; 57 किलो गट – विजयी श्री जाधव (आकुर्डी) विरुध्द प्रणव सस्ते (मोशी) ; 61 किलो गट – विजयी समर्थ गायकवाड (निगडी) विरुध्द केदार लांडगे (भोसरी) ; 65 किलो गट – विजयी योगेश्वर तापकीर (च-होली) विरुध्द राज बालवडकर (पिंपळे गुरव); 70 किलो गट – विजयी परशूराम कँम्प (आकुर्डी) विरुध्द दिग्विजय काळे (च-होली) ; 74 किलो गट – विजयी गौरव हिंगे (रहाटणी) विरुध्द राजू हिप्परकर (रहाटणी) ; 79 किलो गट – विजयी रविंद्र गोरड (पिंपरी) विरुध्द सोहम लोंढे (भोसरी) 86 किलो गट – विजयी शेखर शिंदे (पिंपळे गुरव) विरुध्द देवांग चिंचवडे (चिंचवडे) ; 92 किलो गट – विजयी कुणाल शेवाळे (भोसरी) विरुध्द मेघराज खराडे (पिंपरी) ; 97 किलो गट – विजयी निरंजन बालवडकर (पिंपळे निलख) विरुध्द सौरभ कामथे (चिंचवड) याप्रमाणे आहे.