राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या घरी सदिच्छा भेट
शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीचा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. यानिमित्ताने शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आपले आदरस्थान, श्रद्धास्थान व आपल्या विठ्ठलाला बालाजीच्या मूर्ती ची भेट देऊन स्वागत केले.
शरद पवार यांच्या भेटी मुळे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे भारावून गेले. त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत शरद पवार यांचे स्वागत करीत मनापासून आभार व्यक्त केले. यावेळी शरद पवार यांच्यासोबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे सोबतच नगरसेविका शीतल विठ्ठल उर्फ नाना काटे यांनीही आदरणीय शरद पवार यांचे स्वागत केले.
आज रहाटणी परिसरात शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने नगरसेवक नाना काटे यांनी ‘आज विठ्ठल येणार विठ्ठलाच्या घरी’ या आशयाचे फ्लेक्स लावले होते. आज शरद पवार यांनी त्यांच्या घरी सदिच्छा भेट दिल्यानंतर नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी शरद पवार यांना बालाजीची मूर्ती भेट दिली. यावरूनच असे म्हणणे योग्य आहे की, ‘विठ्ठलाने आपल्या विठ्ठलाला दिली बालाजीची भेट’ या अनोख्या भेटीमुळे शरद पवार यांनीही आनंद व्यक्त करीत नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शितल विठ्ठल उर्फ नाना काटे यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.