शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांच्या वतीने त्यांच्या प्रभागातील नागरिकांसाठी आधार कार्ड दुरुस्ती व नंबर अपडेट करिता एक दिवसाचे शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात प्रभागातील अनेक नागरिकांनी सहभाग घेऊन लाभ घेतला, बऱ्याच नागरिकांचे आतापर्यंत आधार कार्ड दुरुस्त झाले नाहीत तसेच त्यांचे मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नाही, त्यामुळे अनेक नागरिकांना विविध योजनांसाठी उपयोगात येणाऱ्या आधार कार्ड च्या अडचणी व समस्या यांचा सामना करावा लागत असतो .नागरिकांना कोणत्याही अडचणी व समस्या येऊ नये, याकरिता त्यांचे आधार कार्ड दुरुस्त व त्यांचे नंबर अपडेट करण्याकरीता माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांनी हा उपक्रम आयोजित केला. या उपक्रमाचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला व या उपक्रमा बद्दल नागरिकांनी माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांचे आभार व्यक्त केले.