शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
मोशी परिसरामध्ये नागरिकांसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोशी येथील भारत माता चौकातील कविता आल्हाट यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोफत कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. शनिवार दि.16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 10 ते 5 या वेळेत सुरू असून या कार्यक्रमाचा मोशी परिसरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन कविताताई आल्हाट यांनी केले आहे.
कार्यक्रमात संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, मा. शिक्षण मंडळ सभापती धनंजय भालेकर, नगरसेवक अजित गव्हाणे, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष उत्तम आल्हाट, सामाजिक कार्यकर्ते नितीन सस्ते, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गव्हाणे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, सामाजिक कार्यकर्ते संतोष बोराडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष सस्ते , सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र बोराटे, शहराचे उपाध्यक्ष सौ सपना घाडगे, भोसरी विधानसभा उपाध्यक्ष पुनम वाघ, सामाजिक कार्यकर्ते विनोद सस्ते, युवा नेते, सामाजिक कार्यकर्ते राहुल बनकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोकले, तसेच पिंपरी-चिंचवड अतिरिक्त आयुक्त ढाकणे साहेब, भोसरी मनपा हॉस्पिटलच्या आरोग्य अधिकारी डांगे मॅडम, मनपाचे वैद्यकीय अधिकारी, स्टॉप सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते. सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपन्न झाला. या परिसरातील राष्ट्रवादीचे अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक कविताताई संदेश आल्हाट यांनी केले.