पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अकबर मुल्ला यांच्या वतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते आयुब शेख यांच्या सहकार्याने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त गरीब कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तूंची कीट तसेच ब्लँकेट वाटप करण्यात आले या कार्यक्रमानिमित्त सत्तर ते ऐंशी कुटुंबांना मदत करण्यात आली,
सदर कार्यक्रम हा पिंपरी येथील सावली निवारा केंद्र येथे संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी उपमहापौर मोहम्मद भाई पानसरे, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, शहर प्रवक्ते फजल भाई शेख, ओबीसी सेलचे विजय लोखंडे, लिगल सेलचे गोरक्ष लोखंडे, महिला पत्रकार, शबनम न्यूज वृत्तसंस्थेच्या संपादिका शबनम सय्यद, ओबीसी सेलच्या महिला अध्यक्ष सारिका पवार, शकरुल्ला पठाण, सोशल मीडिया सेलचे हमिद भाई शेख, कविता खराडे, फिरोज सय्यद, युवा नेते आझम महंमदभाई पानसरे, रेहान मुल्ला, फरहान मुल्ला, शुभम, सोहेल शेख, आदी मान्यवर उपस्थित होते.