शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
विवाहतिने राहत्या घरात आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या पतीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ममता नगर, जुनी सांगवी येथे सोमवार (दि. 18 ) रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
Advertisement
अश्विनी राहुल शिंदे (रा. ममता नगर जुनी सांगवी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांच्या आईने सांगली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, राहुल शिंदे (वय 40 ) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल शिंदे याने लग्नानंतर फिर्यादी यांची मुलगी अश्विनी हिचा शारीरिक व मानसिक छळ केला. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. असे फिर्यादीत नमूद केले आहे.
Advertisement