शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत होत असलेल्या आजच्या ऑफलाईन सर्वसाधारण सभेला शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अचानक हजेरी लावली. पिंपरी चिंचवड महापालिकेचा कारभार कसा चालतोय हे पाहण्यासाठी शिरूर लोकसभेचे खासदार थेट प्रेक्षक गॅलरीत दाखल झाले आहेत.
महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेत होत असलेल्या ऑफलाईन सर्वसाधारण सभेला शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हजेरी लावली आहे. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील देखील उपस्थित आहेत.
सभेला हजर राहून महानगरपालिकेतील कामकाजाची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महानगर पालिकेच्या कारभारावर राष्ट्रवादीकडून तीक्ष्ण नजर ठेवण्यात येत असल्याची चर्चा महापालिका परिसरात होत आहे.