शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
थेरगाव येथील नवीन रुग्णालयाला भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबर चांद शेख यांनी पिंपरी -चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात नमूद केले आहे कि, थेरगांव येथील नवीन रूग्णालयाला भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे . थेरगांव येथे महानगरपालिकेच्या एकाही वस्तूला मिळकतींना डॉ .बाबासाहेबांचे नाव नाही . थेरगांव मध्ये मोठया प्रमाणात दलित , मागासवर्गीय , ओबीसी , मुस्लीम समाज राहतो . त्यांची ही हिच मागणी आहे . त्यामुळे महापालिकेच्या थेरगांव येथील नवीन रूग्णालयाला एखादया गल्ली बोळातल्या नेत्याचे नाव देण्यापेक्षा महापुरूष भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे . जेणे करून महापुरुषांची आठवण स्मरणात राहिल . म्हणून आयुक्त साहेब आपण थेरगांव येथील महापालिकेच्या नवीन रूग्णालयाला भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे , असेही दिलेल्या निवेदनात बाबर चांद शेख यांनी म्हंटले आहे.