शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांसह त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाई नंतर संपुर्ण स्थायी समितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असुन स्थायी समिती अध्यक्षांसह इतर सदस्य ही स्थायी समितीतील भ्रष्टाचारात सहभागी असल्याची शक्यता बळावली आहे. सध्या या प्रकरणी स्थायी समिती अध्यक्ष व त्यांचे इतर सहकारी जामिनावर बाहेर आहेत. जामिनावर बाहेर असताना पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थायी समिती विद्यमान अध्यक्षांच्या नैतृत्वात अनेक विकासकामांचा निधी मंजुर करीत आहे.. एकंदर स्थायी समिती अध्यक्षांसह इतर त्यांचे सहकारी जामिनावर बाहेर असताना व त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा स्थायी समितीचा कारभार त्यांच्याच हाताने चालवणे हे प्रशासकीय यंत्रणेच्या पारदर्शकतेवर व विश्वासहर्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारे असुन नागरिकांमध्ये यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे..असे मा.विभागीय आयुक्त पुणे यांना दिलेल्या निवेदनात वंचित बहुजन आघाडीचे म्हणणे आहे.
त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची विद्यमान स्थायी समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी व या स्थायी समितीने घेतलेले सर्व निर्णय रद्दबातल करण्यात यावेत यासह आर्थिक घोटाळा करून प्रशासनाची व नागरिकांची दिशाभूल केल्या प्रकरणी स्थायी समितीसह इतर लोकप्रतिनिधींचे नगरसेवक पद तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मा. इंजि. देवेंद्र तायडे यांनी विभागीय आयुक्त यांच्या कडे निवेदनाच्या माध्यमातुन केली आहे.
या वेळी वंचित बहुजण आघाडी शहर कार्याध्यक्ष तथा माजी नगरसेवक अंकुश कानडी, संजीवन कांबळे,महासचिव राजन नायर, संतोष जोगदंड, उपाध्यक्ष धनंजय कांबळे,भारत कुंभारे, प्रवक्ता के. डी. वाघमारे, संघटक बाबुराव फुलमाळी,सचिव राजु चांदणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.