शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरात दिवाळीची लगबग सुरू झाली आहे या दिवाळी निमित्त खास महिलांसाठी महिला बचत गटांसाठी व्यवसाय करण्याची मोठी संधी माजी महापौर नगरसेविका मंगलाताई कदम यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे
प्रभाग क्रमांक 10 संभाजीनगर येथील खास महिला बचत गटांसाठी दिवाळीनिमित्त व्यवसाय करण्यासाठी मा. महापौर सौ. मंगलाताई कदम, लक्ष राज फाउंडेशन, साई शारदा महिला महासंघ व कुशाग्र कदम युथ फाउंडेशन च्या वतीने खाद्यपदार्थ, ज्वेलरी, फॅन्सी ड्रेस, हर्बल प्रोडक्ट, हॅन्डमेड सोप, उठणे, हँडमेड गिफ्ट्स, पणत्या इत्यादी वस्तूंचे भव्य विक्री व प्रदर्शन मेळावा 22 ते 25 ऑक्टोबर पासून आयोजित करण्यात आला आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन 22 ऑक्टोबर रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त श्री.अजय चारथणकर यांच्या हस्ते करण्यात आले. करोणाच्या महामारी नंतर घरगुती व्यवसाय करण्यासाठी प्रथमच महिलांना एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले नागरिकांचा प्रतिसाद बघून येणाऱ्या काळामध्ये सदर बचत गटांना मोठ्याप्रमाणात व्यासपीठ उपलब्ध करून शहरांमध्ये अनेक ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी संधी मिळून देणार असे नमूद केले.
या उद्घाटन प्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचेच्या मा.महापौर सौ.मंगलाताई कदम, सौ.रेखा पवार सौ.कविता खराडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.सतीश सराटकर, श्री.किरण वाघुळदे, श्री कुशाग्र कदम, श्री.गणेश शर्मा, श्री कल्पेश हरणे,श्री अब्दुल शिकलगार आदी उपस्थित होते.