शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
क्रीडा सभापती उत्तम केंदळे यांच्या नेतृत्वामध्ये घेतली क्रीडा विभागाने भरारी
शहरात ११ ते २२ डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे नियोजन
शहरात मुंबईच्या धर्तीवर इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
क्रीडा विभागाच्या झालेल्या बैठकीत आदर्श क्रिडा धोरणाची आखणी – क्रिडा सभापती प्रा उत्तम केंदळे
नगरसेवक उत्तम केंदळे यांनी प्रभागातील कामा बरोबर क्रीडा विभागाचाही केला विकास
ऑलिम्पिक मिशन असणाऱ्या क्रीडा सभापती यांनी केली पायाभूत आखनी
क्रीडा सभापती प्रा उत्तम केंदळे यांच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रासाठी ऐतिहासिक निर्णय व धोरणाची आखणी
पिंपरी चिंचवड :- क्रीडा विभागाची कामगिरी बघता क्रीडा सभापती उत्तम केंदळे यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा विभागाची गाडी सुसाट धावताना दिसत आहे.क्रीडा संबंधित विविध विषय मार्गी लावले आहेत. आदर्श क्रीडा धोरणाची आखणी करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाची बैठक नुकतीच महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त यांच्या दालनात संपन्न झाली यावेळी केंदळे बोलत होते.
यावेळी आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे आदी उपस्थित होते.
आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या नुकत्याच क्रीडा विभागाच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.यामध्ये क्रीडा विषयक पायाभूत सुविधा व खेळाडू घडवण्यासाठी मगर स्टेडियम येथे स्वतंत्र क्रीडा विभाग कार्यालय बांधण्यात येणार आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्वोत्कृष्ट क्रीडा पुरस्कार (खेळाडू ,दिव्यांग खेळाडू व मार्गदर्शक) २०२१ क्रीडा पुरस्कार धोरण मसुदा तयार करण्यात आल्यामुळे देशातील राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय खेळाडू असो त्याला महानगरपालिकेच्या वतीने पुरस्कार दिला जाणार आहे.नीरज चोपडा सारख्या खेळाडूला ही पुरस्कार मिळू शकतो त्यामुळे शहरातील खेळाडूंना एक ऊर्जा निर्माण होणार आहे. कबड्डी व्यवसायिक संघ (महिला व पुरुष) तयार करण्याचे धोरण कार्यान्वित करण्यात येणार आहे.ठाणे येथील अभ्यासिकेचा अभ्यास करून व पाहणी अहवाल बघून स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिकेचे धोरण तयार करून त्याचा अंतर्भाव क्रिडा विभागामध्ये मध्ये करण्यात येणार आहे.व्यायामशाळा सेवाशुल्क तत्वावर देण्याऐवजी व्यायाम शुल्क दरात वाढ करून व्यायामशाळा पाच वर्षे भाडे कराराने चालविण्यास देण्यासाठी सि.टी. ओ. कार्यालयाच्या सहकार्याने धोरण राबवण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा सभापती केंदळे यांनी दिली.
राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे नियोजन ११ ते २२ डिसेंबर २०२१ या दहा दिवसाच्या दरम्यान करण्यात आलेले आहे.येणाऱ्या सहा महिन्यात मुंबईच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यामध्ये देशातील ३० संघ सहभागी होणार आहेत.जलतरण तलाव चालू व अद्यावत करण्यात येणार आहेत.दोन वर्षापासून स्पर्धा झालेल्या नाहीत त्यामुळे दोन महिन्यात महापौर चषक स्पर्धा घेण्यात येणार आहेत.सर्व प्रकारच्या खेळ सुविधा कार्यक्षमतेने चालू करून खेळाडू तयार करण्यात येणार आहेत.संगीत अकादमी मार्फत आमंत्रित करण्यात येणार्या नामांकित कलाकारांच्या मानधनात वाढ करून प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे.पाच ते सहा ध्येय समोर ठेवून पाच वर्षाचे नियोजन करण्यात आले आहे.त्यामुळे तज्ञ, कोच, प्रशिक्षक यांच्याद्वारे शहरातील खेळाडूंना उत्तम प्रकारे घडवण्याचं काम होणार आहे.मैदानाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने प्रत्येक मोठ्या मैदानावर सुरक्षा व्यवस्थेकरीता रखवालदार निवास तयार करून निवासी रखवालदाराची नियुक्ती करण्याच्या सूचनाही केंदळे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
आयुक्त राजेश पाटील स्वतः खेळाडू असल्यामुळे त्यांना ही खेळाची जाण आहे.स्मार्ट सिटी बरोबरच येणाऱ्या काळात शहराचा स्पोर्ट्स सिटी म्हणून देशात उल्लेख होण्याचा मानस त्यांनी बाळगलेला दिसत आहे. त्यामुळे त्यांनी खेळाविषयी असलेले प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
केंदळे हे आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करत असलेल्या कामामुळे शहर हे औद्योगिक नगरी, संतांची भूमी म्हणून ओळखले जात होते. परंतु यापुढे शहराच्या नावलौकिकात अजून भर पडून क्रीडानगरी म्हणून ओळखली जाणार आहे. प्रभागातील कामे करून क्रीडा विभागाचा विकास केल्यामुळे नागरिकांकडून केंदळे यांचे कौतुक केल्या जात आहे.