शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
विकास नगर किवळे मामुर्डी भागात कलर पेंग्विन ब्लॉक न बसविण्याचे कारण द्या, असे विचारणा शिवसेनेचे राजेंद्र तरस यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. राजेंद्र तरस यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सध्या स्तिथीत साधे ब्लॉक बसविण्याचे कामे चालू आहेत व निकृष्ट दर्जाचे असून तरी आपण त्या कामाची व दर्जाची चौकशी करावी नागरिकांच्या निदर्शनास अशी बाब आली पिंपरी चिंचवड शहर भर सर्वत्र कलर चे ब्लॉक बसविण्याचे काम चालू आहे मग विकासनगर किवळे मामुर्डी या भागातच साधे ब्लॉक का अशा नागरिकांच्या तक्रारी वरून मी आपणास विचारू पाहतो कि आमच्या भागात कलर ब्लॉक न बसविण्याचे कारण द्यावे. व जे काम करणारा कॉन्ट्रॅक्टर आहे (MOTWANI) त्याच व्यक्तीला M B CAMP येथील कॅन्टोन्मेंट हद्दीतील करारापोटी जी जागा घेऊन जॉगिंग ट्रक व गार्डन चे काम चालू असून ते अत्यंत निकृष्ट दर्जाच झाले असून त्याची चौकशी करण्यात यावी व या कॉन्ट्रॅक्टर ला निकृष्ट दर्जाचा कॉन्ट्रॅक्टर घोषित करून काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे.
व हे जे गार्डन चे काम आहे हे काही कोटी रुपये अंदाजे वाढीव खर्च मंजूर करून जे काम झाले आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे त्याची चौकशी करण्यात यावी अन्यथा मुख्यमंत्री साहेबाना तक्रार करून जनआंदोलन उभारण्यात येईल. व किवळे विकासनगर भागात ३५० कोटी रुपये पेक्षा जास्त निधी मंजूर झाला व तो कुठे गेला हे आपण उघड करावे.असेही दिलेल्या निवेदनात राजेंद्र तरस यांनी म्हंटले आहे.