शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
आपल्या देशातील लोकशाही संपूर्ण जगात भक्कम व यशस्वी असल्याचे भारत निवडणूक आयोगाने सर्व जगाला दाखवून दिलेले आहे. मतदानाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
त्याचाच भाग म्हणून आज पासून अश्विनी महिला विकास संस्था, सदानंद कृष्णा शेट्टी माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि कार्यक्षम नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी यांच्या माध्यमातून मतदान नोंदणी आपल्या दारी ह्या कार्यक्रमाल श्रद्धास्थान स्वर्गीय पद्मावती अम्मा शेट्टी व अण्णा कृष्णा शेट्टी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली.
तसेच प्रसंगी मतदान जनजागृती वाहनाचे उद्घाटन ही शेट्टी यांच्या हस्ते सदाआनंद नगर येथील समाज मंदिरासमोर करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित सदानंद कृष्णा शेट्टी मित्रपरिवार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया प्रमाणावर उपस्थितीत होते.
देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणूकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. मतदान नोंदणी साठी पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. सादर मतदान जनजागृती मोहीम ही ३१ ऑक्टो. २०२१ पर्यंत सुरू असणार आहे.