शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या महागाई दरवाढ विरोधात “शिव आक्रोश जन आंदोलन” आज पिंपरीत करण्यात आले.
केंद्र सरकारच्या महागाई दरवाढ विरोधात ‘शिव आक्रोश जनआंदोलन’ शहर शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख ऍड. सचिन भोसले यांच्या नेतृत्वात आज सकाळी 10 :30 वाजता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर चौक पिंपरी येथून सुरू होऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे इंधन जास्त तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीविरोधात चौकात महिलांनी चूल पेटवून त्यावर भाकरी बनवली तसेच दोन चाकी वाहन बैलगाडी मध्ये घेऊन केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शहरातील मान्यवरांची मार्गदर्शन झाले. सदर कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना प्रदेश संघटक गोविंद घोळवे, शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, महिला संपर्कप्रमुख वैशाली सूर्यवंशी, जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, शैलजा खंडागळे, वैशाली मराठे, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, युवा सेना शहर संघटक विश्वजीत बारणे, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष दस्तगीर मणियार, डॉ. जावेद आत्तार , शहर संघटक संपत पवार, रोमी संधू, भाविक देशमुख, बशीत सुतार, सचिन सानप, विशाल यादव, विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, अनंत कोऱ्हाळे, महिला संघटिका अनिता तुतारे,कल्पना शेटे, शशिकला उभे, विधानसभा संघटक माऊली जगताप, निलेश हाके, पंकज दीक्षित, उपशहरप्रमुख तुषार नवले, पांडुरंग पाटील ,अमोल निकम, नवनाथ तरस, हरेश नखाते, संतोष पवार, सुधाकर नलावडे, अनिल सोमवंशी, शैलेश मोरे, राजेंद्र तरस, रुपेश कदम, नगरसेवक अमित गावडे, मीनल यादव, रेखाताई दर्शीले, अश्विनी वाघमारे, माजी नगरसेवक महादेव गव्हाणे, सुरेखा बोरुडे, कैलास नेवासकर, विधानसभा संघटक दिलीप भोंडवे, रावसाहेब थोरात, समन्वयक ऋषिकेश जाधव, युवराज कोकाटे, आबा भोसले, विजय दर्शीले, परशुराम आल्हाट, महेश जाधव, सचिन धुमाळ, राजू सोलापुरे, शिवाजी कुऱ्हाळकर, दीपक कांबळे, चंद्रकांत शिंदे, दत्ताराम साळवी, मच्छिंद्र देशमुख, विशाल गावडे, प्रदीप दळवी, समीर पवार, राजेश पाटील, सतीश मरळ, नितीन बोंडे, प्रदीप सकपाळ, प्रदिप चव्हाण, किशोर सवयी, संजय गाढवे, किसन शेवते, विकास भिसे, गणेश आहेर, गजानन दावडे, राजू भालेकर, कृष्णदेव त्रिंबके, विकास लांडे, प्रकाश शिंगाडे, संजय गाढवे, रूपाली अल्हाट, बापू ढेकळे, दत्तात्रय शिंदे, दयानंद साठे, अरुण पात्रे, संदीप भालके, राजगिरी, रजनी वाघ, मनिषा पारडे, भाग्यश्री मस्के, डॉ. वैशाली मिश्रा, कमल गोडांबे यांनी काळ्या फित बांधून केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला. या कार्यक्रमात शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी व महिला आघाडी व सेना शिवसेना अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.