शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी परिसरातील दिघी शिवसेना शाखेच्या प्रमुख सौ. मनीषा परांडे यांची दिघी विभाग प्रमुख पदावर नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. सदर नेमणूक ही पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख सौ. वैशाली सूर्यवंशी तसेच जिल्हा संघटक सौ. सुलभाताई उबाळे व उप जिल्हा संघटक सौ. वैशाली मराठे यांच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच नियुक्तीचे पत्र त्यांना देण्यात आले.
आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना वतीने पक्ष संघटनेवर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सौ. मनीषा परांडे यांची दिघी विभाग प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर मनीषा परांडे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, शिवसेना पक्ष संघटना वाढीसाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असून, येत्या महानगरपालिका निवडणुकी नंतर महापालिकेत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक दिसतील या हेतूने काम करणार आहे तसेच महिलांचे संघटन ही घडविणार असून पक्षाच्या माध्यमातून अनेक महिलांना शिवसेनेत सामावून घेण्यात येणार आहे.
यावेळी भोसरी विधानसभा, पिंपरी विधानसभा मतदारसंघ व चिंचवड विधानसभा मतदार संघातील सर्व महिला आघाडी व पदाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली.