शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्र २८ रहाटणी – पिंपळे सौदागर या प्रभागामध्ये धूर फवारणी करा, अशी मागणी मा.विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, प्रभाग क्र.२८ रहाटणी – पिंपळे सौदागर येथे सध्या आठवड्यातून एकदा धूर फवारणी करण्यात येत आहे. प्रभागात रात्रीच्या वेळेला मच्छरांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिक प्रमाणात वाढत चालला आहे.त्यामुळे नागरिकांच्या मच्छरविषयी तक्रारी वाढल्या आहेत.रहिवाशांना मच्छरापासून डेंग्यू,मलेरिया हिवताप अशा प्रकारचे आजार होऊन आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे.
तसेच प्रभागात अजूनही काही ठिकाणी खोदकामामुळे त्या खड्ड्याच्या ठिकाणी पावसाचे किंवा वापरलेले पाणी साचून डबके तयार होवून त्यातून डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते.अशा डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे शोधून त्यावर उपाय योजना कराव्यात. या नागरिकांच्या आरोग्याच्या बाबींचा विचार करता मच्छरांमुळे होणारे आजार रोखण्यासाठी प्रभागामध्ये दररोज धूर फवारणी व औषध फवारणी करण्याचे आदेश देण्यात यावे, असे ही सदर निवेदनात नगरसेवक नाना काटे यांनी नमूद केले आहे.