शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
Advertisement
यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेतर्फे शिवाजीनगर येथील संतमाई स्कील डेव्हलपमेंट सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘यशोजत्रा’ या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सोमवारी या प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन संस्थेच्या संचालिका शोभा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
२८ ऑक्टोबरपर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार असून या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेला दिवाळी फराळ, आकाशकंदील, पणत्या आणि कलाकुसरीच्या विविध वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विक्री कौशल्य देखील आत्मसात व्हावे या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे असे मत ‘यशस्वी’ संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी यावेळी व्यक्त केले.
Advertisement
Advertisement