शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
पुणे विभागातील 19 लाख 63 हजार 240 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 20 लाख 10 हजार 99 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 242 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 41 हजार 617 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.07 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.67 टक्के आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 49 हजार 873 रुग्णांपैकी 11 लाख 27 हजार 595 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 3 हजार 304 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 974 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 98.06 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 50 हजार 893 रुग्णांपैकी 2 लाख 43 हजार 171 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 308 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 414 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 3 हजार 472 रुग्णांपैकी 1 लाख 98 हजार 40 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 364 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 68 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 99 हजार 296 रुग्णांपैकी 1 लाख 93 हजार 756 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 169 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 371 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 6 हजार 565 रुग्णांपैकी 2 लाख 678 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 97 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 790 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 313 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 219, सातारा जिल्ह्यात 33, सोलापूर जिल्ह्यात 38, सांगली जिल्ह्यात 12 तर कोल्हापूर जिल्ह्यात 11 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 624 आहे. पुणे जिल्हयामध्ये 346 सातारा जिल्हयामध्ये 189, सोलापूर जिल्हयामध्ये 60, सांगली जिल्हयामध्ये 21 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 8 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 79 लाख 35 हजार 629 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 20 लाख 10 हजार 99 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.