शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी टॅब देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वाहतूक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजीज भाई शेख यांनी केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की पिंपरी-चिंचवड शहरातील मनपा शाळेत गरीब कुटुंबातील अनेक मुले शिक्षण घेत आहेत सध्या ऑनलाइन पद्धतीमुळे गरीब विद्यार्थ्यांना मोबाईल उपलब्ध होत नाही त्यामुळे अशा गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते
याकरिता पिंपरी चिंचवड महानगर पालिका वतीने गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना टॅब देण्यात यावे तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत खरेदीचा विषय मंजूर करण्यात आला आहे परंतु अद्यापही विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आलेले नाही तरी अशा गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी टॅब द्यावे जेणेकरून या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहणार नाही अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजीज भाई शेख व पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष रामभाऊ बनसोडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे सदर निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांना देण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.