शबनम न्यूज | मुंबई
क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खानवरील कारवाई टाळण्यासाठी २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप झालेल्या एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बुधवारी उच्चस्तरीय चौकशी समितीने साडेचार तास चौकशी केली.
पंच साक्षीदार प्रभाकर साईल याने शपथपत्राद्वारे त्यांच्यावर केलेले गंभीर आरोपांच्या अनुषंगाने त्यांची सविस्तर विचारणा करून जबाब नोंदविण्यात आला. आवश्यकतेनुसार त्यांच्याकडून आणखी काही कागदपत्रे जमा केली जाणार आहेत.
Advertisement
ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती बुधवारी मुंबईत दाखल झाली. तसेच संबंधित तपास अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली. त्यानंतर समीर वानखेडे यांच्याकडे दोन टप्यात तब्बल साडेचार तास चौकशी केली.
Advertisement