शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
कोरोना काळातून सावरत असताना विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत असताना महावितरण कडून विज बिल टप्प्याटप्प्याने आकारणी सुरू आहे. नागरिकही आपापल्या परीने विज बिल भरण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच ऐन सणासुदीच्या काळात महावितरणकडून नागरिकांच्या घरातील वीज पुरवठा बिल न भरल्यामुळे खंडित करण्यात येत आहे. तरी सदर कारवाई तूर्तास थांबून नागरिकांना दिवाळीच्या १५ दिवस मुभा द्यावी, त्यानंतर महावितरण कडून पुन्हा आपली कारवाई सुरू करण्यात यावी, असे मागणीचे निवेदन पिंपरी युवासेनेचे विधानसभा अधिकारी निलेश हाके यांनी पिंपरी महावितरण चे अति.कार्यकारी अभियंता गणेश चाकूरकर यांना दिले आहे.
Advertisement
Advertisement