शबनम न्यूज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
पुणे विभागातील 19 लाख 63 हजार 816 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 20 लाख 10 हजार 556 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 113 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 41 हजार 627 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.07 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.68 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 50 हजार 179 रुग्णांपैकी 11 लाख 27 हजार 988 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 3 हजार 217 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 974 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 98.07 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 50 हजार 961 रुग्णांपैकी 2 लाख 43 हजार 266 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 275 आहेत. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 420 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 3 हजार 530 रुग्णांपैकी 1 लाख 98 हजार 108 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 350 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 72 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 99 हजार 313 रुग्णांपैकी 1 लाख 93 हजार 772 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 170 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 371 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 6 हजार 573 रुग्णांपैकी 2 लाख 682 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 101 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 790 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 457 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 306, सातारा जिल्ह्यात 68, सोलापूर जिल्ह्यात 58, सांगली जिल्ह्यात 17 तर कोल्हापूर जिल्ह्यात 8 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 576 आहे. पुणे जिल्हयामध्ये 393, सातारा जिल्हयामध्ये 95, सोलापूर जिल्हयामध्ये 68, सांगली जिल्हयामध्ये 16 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 4 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 79 लाख 60 हजार 752 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 20 लाख 10 हजार 556 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.