शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पीएमपीएमएल कडून मार्ग क्रमांक ३६८ – निगडी ते लोणावळा रेल्वे स्टेशन हा नवीन बस मार्ग आज दिनांक २९
ऑक्टोबर २०२१ पासून सुरू करण्यात आला. भक्ती शक्ती उड्डाणपूल निगडी येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या
महापौर मा. सौ. उषाताई ऊर्फ माई ढोरे व उपमहापौर मा. सौ. नानी ऊर्फ हिराबाई घुले यांच्या हस्ते या बससेवेचे उदघाटन
करण्यात आले. पीएमपीएमएलच्या बसला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यामुळे ही बस सर्वांचे लक्ष वेधून
घेत होती.
याप्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका मा. सुमनताई पवळे, नगरसेवक मा.श्री. सचिन चिखले,
नगरसेवक मा. श्री. उत्तम केंदळे, पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाह मा.
प्रा. सौ. ज्योत्स्ना एकबोटे, पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक मा. श्री. दत्तात्रय झेंडे, मुख्यालय क्र. २ चे प्रमुख श्री. संतोष
माने, निगडी डेपो मॅनेजर श्री. शांताराम वाघेरे, डी.एम.ई. श्री. राजेंद्र शिंदे, भोसरी डेपो मॅनेजर श्री. रमेश चव्हाण, श्री.
नानासाहेब सोनावणे, श्री. रविंद्र लांडगे, श्री. राजेंद्र टकले यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोणावळा, कामशेत व मावळातील कामगार व विद्यार्थी यांची या बससेवेसाठी आग्रही मागणी होती. तसेच पुणे
महानगरपालिकेच्या नगरसेविका व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाह मा. प्रा. सौ. ज्योत्स्ना एकबोटे यांनीही या
बससेवेची मागणी केली होती.
मार्ग क्र. ३६८ – निगडी ते लोणावळा रेल्वे स्टेशन या बससेवेचा मार्ग निगडी पवळे चौक, भक्ती शक्ती, देहू रोड
बाजार, सोमाटणे फाटा, वडगांव फाटा, जिजामाता चौक तळेगांव, तळेगांव स्टेशन, वडगांव मावळ, मोहितेवाडी, कान्हा
फाटा, कामशेत, कार्ला फाटा, वलवण, लोणावळा एसटी स्टॅण्ड, लोणावळा रेल्वे स्टेशन असा आहे.
याप्रसंगी बोलताना महापौर मा. सौ. उषाताई ऊर्फ माई ढोरे म्हणाल्या, निगडी ते लोणावळा हा नवीन बसमार्ग
लोणावळा, कामशेत, मावळ भागातील नोकरदार व विद्यार्थी यांना उपयुक्त ठरणार आहे. नवीन बसमार्ग चालू केला म्हणजे
जबाबदारी आली. प्रवाशांना चालक व वाहकांनी चांगली सेवा देऊन जबाबदारी पार पाडावी. पीएमपीएमएल च्या
कर्मचाऱ्यांना कोरोना काळात आर्थिक झळ पोहोचू नये यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगली आर्थिक मदत केली
व करत आहोत.
नगरसेवक मा. श्री.सचिन चिखले म्हणाले, निगडी येथे लोणावळा, कामशेत व मावळातून मोठ्या प्रमाणात कामगार
व विद्यार्थी येतात. तसेच निगडी येथून लोणावळ्याला निसर्गसौंदर्य पाहायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
पीएमपीएमएलने सुरू केलेल्या या नवीन बसमार्गामुळे कामगार, विद्यार्थी व पर्यटकांना एक नवीन चांगला पर्याय उपलब्ध
झाला आहे. आपण सर्वांनी खाजगी वाहनांनी प्रवास न करता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करण्याचा संकल्प केला
पाहिजे. यामुळे आपण सर्वजण पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावू शकतो.
पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक मा. श्री. दत्तात्रय झेंडे म्हणाले, निगडी ते लोणावळा या मार्गावर सध्या ९
बसेसद्वारे दर अर्ध्या तासाने दिवसभरात एकूण ६८ फेऱ्या होणार आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून आणखी बसेस वाढविल्या
जातील. निगडी ही औद्योगिक नगरी आहे तर लोणावळा हे निसर्गसौंदर्याने नटलेले पर्यटनस्थळ आहे. कामगार, विद्यार्थी व
पर्यटकांना माफक दरात सुरक्षित प्रवासाची सुविधा या बससेवेच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी
महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुणे जिल्ह्यातील शिवनेरी, तोरणा, राजगड, सिंहगड, पुरंदर अशा महत्वपूर्ण
किल्ल्यांना पर्यटकांना भेट देता यावी यासाठी किल्लेदर्शन बससेवा सुरु करण्याचाही आमचा मानस आहे.
याप्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका मा. सुमनताई पवळे, पुणे महानगरपालिकेच्या
नगरसेविका व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाह मा. प्रा. सौ. ज्योत्स्ना एकबोटे यांनीही मनोगत व्यक्त केले.