शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील जाधव वाडी परिसरातील माजी महापौर ,विद्यमान नगरसेवक राहुल जाधव व श्री दत्त दिगंबर पतसंस्थेच्या अध्यक्ष सौ मंगल राहुल जाधव यांच्या संकल्पनेतून राहुल जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन वतीने चिखली, मोशी, रिव्हर रेसिडेन्सी सोसायटी जवळ दिवाळी बाजार फनफेअरचे आयोजन करण्यात आले होते. या फनफेअरचे उद्घाटन पूजा महेश लांडगे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. यावेळी माजी महापौर व विद्यमान नगरसेवक राहुल जाधव, श्री दत्त दिगंबर महिला अध्यक्ष मंगल जाधव यांच्यासह परिसरातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम 25 ऑक्टोबर पासून सुरु झाला असून, 16 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे.
माजी महापौर राहुल जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन वतीने आयोजित या दिवाळी बाजार मध्ये प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांसाठी दिवाळी फराळाचे पदार्थ, आकाश कंदील, उटणं, कपड्यांचे स्टॉल ,दिवाळीसाठी लागणारे सर्व प्रकारचे सजावटीचे सामान चे स्टॉल तसेच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत तसेच विविध व्यवसाय नागरिकांसाठी येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या दिवाळी बाजार फन फेअर व मनोरंजन नगरी सोबतच या दिवाळी सणाच्या निमित्ताने महिला बचत गट , स्वयंसेवी संस्था तसेच होतकरू महिला यांना व्यवसाय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याच्या भावना यावेळी नगरसेवक राहुल जाधव यांनी व्यक्त केल्या
शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे यांनी यावेळी आपल्या प्रतिक्रिया देतांना नगरसेवक राहुल जाधव व त्यांच्या पत्नी मंगल राहुल जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले. मंगल जाधव, राहुल जाधव या दाम्पत्यांनी परिसरातील महिलांच्या कलेला वाव देऊन त्यांना या फनफेअर च्या माध्यमातून त्यांच्या वस्तू आणि पदार्थ विक्रीसाठी मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले. त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. या बरोबरच लहान मुलांसाठी बाल जत्रा चे आयोजन करून त्यांचा देखील दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित केला आहे. यामुळे खऱ्या अर्थाने येथील परिसरातील नागरिकांची दिवाळी सुरू झाल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. असे आपली प्रतिक्रिया देताना सांगितले.