राजेश्वरी शिक्षण संस्थेच्या १०व्या वर्धापन दिनानिमित्त महिलांचा सन्मान
अंध मुलानी संगीत सप्तसुर आँकेस्टाच्या माध्यमातून अणली रंगत
पुणे प्रतिनिधी : राजेश्वरी शिक्षण संस्थेचा १० वा वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा “सलाम ती च्या जिद्दीला “पुरस्कार देण्यात येतो. वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मिस युनिव्हर्स फायनल साची कुदळे यांना सौंदर्य रत्न, सुनंदा डेरे समाज रत्न, अड. अनिशा फणसळकर कायदा रत्न, किर्ती पुणेकर उद्योगरत्न, डॉ. पूर्णिमा कदम गुरुवर्य रत्न, मृणाल पटवर्धन समजरत्न, वैद्य संगीता देव्हारे वैद्यरत्न, मेहमूदा शेख साहित्यरत्न, कस्तुरी पाटील समाजरत्न, स्वाती वांगी मेकअप जादुई रत्न, मंगलाताई नागुल समाजरत्न, ज्योती मारणे ग्रामीण रत्न, रेखा आखाडे समजरत्न, सादिया पठाण ज्ञाना रत्न, निशा पाटील समाजरत्न, स्नेहल मुळीक दुर्गा रत्न आणि डॉ. किर्ती कुलकर्णी वैद्य रत्न असे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कोरोना काळात ज्या व्यक्तींनी काम केले, त्यांच्या साठी कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये मंजू वाघमारे, आर्य झुझम, निकिता खताळ, अक्षय भोईटे यांचा समवेश होता.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून, डॉ. दत्ताजी कोहिनकर ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक, सुरेश कोते लिज्जत पापड, पृथ्वीराज दादा सुतार (शिवसेना गटनेते), राजेश पुंडलिक मोरे (विभाग प्रमुख शिवसेना), गौरव घुले (राष्ट्रीय खेळाडू आणि सामाजिक कार्यकर्ते) , सुरज लोखंडे (शिवसेना विभाग प्रमुख) , रवींद्र पाटील रोटरी अध्यक्ष, अभिनेता बाबू नाईक, अजित कुमठेकर, डॉक्टर भवाळकर, एच पी ज्वेलर्स च्या जागृती सोनी, स्वर्णमाला ज्वेलर्स रमेश वर्मा आदी उपस्थीत होते.
संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा निवेदिता ताई बडदे यांनी प्रास्ताविक केले तर संस्थेच्या उपाध्यक्ष सुनंदाताई डेरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला स्वर्णमाला ज्वेलर्स चे विशेष सहकार्य लाभले. लकी ड्रॉ मध्ये लीनाज १ ग्राम ज्वेलर्स कडून १० नथी देण्यात आल्या.
हा कार्यक्रम अण्णा भाऊ साठे सभागृह सातारा रोड येथे संपन्न झाला