शबनम न्यूज | परळी
बीड | प्रतिनिधी
परळी येथील नगरसेवक श्री.पवनकुमार मुंडे यांच्या MVR या रेडिमिक्स काँक्रीट व्यवसायाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमास भाजप नेत्या पंकजा मुंडे, मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल अण्णा शेळके, भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे प्रमुख्याने उपस्थित होते.
‘वाढत्या शहरीकरणामुळे बांधकाम क्षेत्राशी संबंधित व्यवसायास निश्चितच वाव आहे. प्रामाणिकपणा व सातत्य ठेवले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.व्हिजन ठेवून काम केले तर सर्व काही शक्य आहे. उत्तम व दर्जेदार सेवा यामुळे कंपनीने अल्पावधीतच नावलौकिक मिळविला आहे.पवनजी तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! या शब्दात मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.महिला बालकल्याण मंत्री मा.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे , पर्वती विधानसभेच्या आमदार मा.माधुरीताई मिसाळ, भोसरी विधानसभेचे आमदार श्री. महेशदादा लांडगे,पोलीस उपायुक्त श्री.मंचकराव इप्पर, नगरसेवक परळी श्री.पवनकुमार मुंडे, सौ.मीनाक्षीताई पाटील, नगरसेविका सौ.योगिताताई नागरगोजे,नगरसेवक श्री.केशव घोळवे, श्री.सदाशिव खाडे, माजी नगरसेवक श्री.दत्तात्रय खाडे, श्री.अशोक मुंडे, श्री.नीळकंठ चाटे, श्री.भरत गीते, श्री.समीर फाटक, श्री.उपेन छाजेड, श्री.गजानन गावडे, श्री.चैतन्य रायसोनी, श्री.निलेश बोधळे, श्री.बाळासाहेब गिते, श्री.विनायक साठे, श्री.दिपक बांगर, श्री.विनोद सामंत व इतर मान्यवर उपस्थित होते.