शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
सध्या दिवाळी सण हा मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा होत आहे. सर्वच क्षेत्रातील नोकरदार वर्ग, कामगारवर्ग यांना दिवाळी हा सण आनंदमय जावा, याकरिता प्रशासन वतीनेही बोनस,पगार वाढ करण्यात आली असून, कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनाही बोनस व पगार मिळाले आहे. सर्व क्षेत्रातील कामगार हे आनंदाने दिवाळी साजरी करत असताना रिक्षा चालक, मालक यांनाही हा दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता यावा, याकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शिक्षण समिती सभापती विद्यमान नगरसेविका मनिषा पवार तसेच थेरगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते प्रमोद पवार यांनी रिक्षा मालक, चालक व परवानाधारक यांना गणवेश वाटप करून त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सौजण्याने व नगरसेविका तथा शिक्षण मंडळ सभापती पि. चि. म न पा. सौ. मनिषाताई पवार यांच्या वतीने रिक्षा मालक व परवाना धारक यांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी काळूराम बारणे, निलेश दळवी , प्रमोद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमातील उपस्थितांचे स्वागत प्रमोदभाऊ पवार यांनी केले. तसेच सूत्र संचालन सचिन वंजारे यांनी केले. व आभार विनोद पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जावेद शेख, राजू भंडारी, सागर वाघमारे, विजू गायकवाड, संभाजी आरसुळे, समीर आत्तर, विनोद मिरगणे, अथक परिश्रम घेतले.