शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी ते फुगेवाडी या प्राधान्य मार्गावर डिसेंबर 2021 पर्यंत मेट्रो धावणार आहे. पीसीएमसी ते फुगेवाडी मार्गावर भोसरी वगळता सर्व मेट्रो स्टेशनचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती महा मेट्रोचे कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली. 7 किलोमीटर दरम्यान स्टेशन आहेत .प्राधान्य मार्गावर पिंपरी-चिंचवड, संत तुकाराम नगर, भोसरी (नाशिक फाटा) कासारवाडी आणि फुगेवाडी अशा पाच स्टेशनचा समावेश आहे.
पुणे मेट्रो चे काम पुढील डिसेंबर 2022 म्हणजेच 13 महिन्यात पूर्ण होणार आहे. डिसेंबर 2022 पर्यंत काम पूर्ण होऊन मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार असल्याचा विश्वास महा मेट्रो कडून व्यक्त करण्यात आला आहे.
संत तुकाराम नगर स्टेशनचे काम पूर्ण झाले असून, फुगेवाडी स्टेशनचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. संत तुकाराम नगर ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे कॉलेज येथील स्थानिकांची कामे 50 ते 60 टक्के पूर्ण झाली आहेत. तर 12 किमी भुयारी मार्गाचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. .इलेक्ट्रिक OHE चे काम 50 टक्के पूर्ण झाले आहेत. रेंज हिल डेपो चे काम 83 टक्के तर डेपोचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहेत.