शबनम न्युज | मुबंई
मुबंई | प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी, कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश यांच्या नेतृत्वाखालील माजी आमदार नितीनराजे व स्वराज्य जनरल कामगार सेनेचे संस्थापक अमित कदम यांनी सांगली येथील कामगार आयुक्त कार्यालयासमोर दि. १ नोव्हेंबर २०२१ रोजी हजारो बांधकाम कामगारांसह मोर्चा, धरणे, खरडा भाकरी खात खात बोंबाबोंब आंदोलनांचे केले होते.
भाजपा कामगार आघाडीकडून बांधकाम कामांच्या प्रलंबित मागणीसाठी ऐन दिवाळीत महाराष्ट्रभर आंदोलनांची सुरुवात केल्याने सरकार खडबडून जागे झाल्याचे चित्र आहे.
कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या निर्देशानंतर कामगार विभागातील सर्व विभागीय कार्यालये व जिल्हा कार्यालयात तीन दिवसीय शिबीरांचे आयोजन करुन मोठ्या प्रमाणावर प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात आले. या चार दिवसात 55 हजार बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली तर एक हजार २०० कामगारांचे नूतनीकरण करण्यात आले. यापैकी ८ हजार ८२५ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करून त्यांना ७ कोटी ३४ लाख २१ हजार ८३२ रुपये वाटप करण्यात आले आहे.
सांगली येथील अंदोलनात भाजपा कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत लांडगे, कामगार नेते कामगार नेते संदिप पाटोळे, राहुल धोत्रे भाजपा कामगार आघाडीचे पाटील, प्रदेश सचिव एकनाथ बागडी, प्रदेश सदस्य अशोक वनवे पाटील, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष निलेश बडदे, पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस व एसटी कामगार नेते अविनाश मोहिते, कामगार आघाडीचे कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंदराव साने, सांगली जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, सातारा जिल्हा सरचिटणीस भाईजी गावडे, कराड शहराध्यक्ष विश्वनाथ फुटाणे आदी सहभागी होते.