शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
दिवाळी सणात सर्वचजण आपआपल्या घरी गोडधोड पदार्थांसह चवदार फराळांची मेजवाणी घेत असतात.परंतु, कोरोनाच्या महामारीत सुध्दा ज्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोरोनामुळे मृत्यु झालेल्यां रूग्णांवर योग्यप्रकारे अंत्यसंस्कार केले. ज्यांच्यामुळे मृतांचा ढिग अंत्यसंस्कारासाठी लागला नाही, अशा पिंपरीमधील भाटनगर स्मशान भूमीतल्या कामगारांना दिवाळी काय अन् दसरा काय अशीच अवस्था असते. अशा सर्व स्मशानातल्या कामगारांसोबत सोबत आझमभाई पानसरे यांनी दिवाळी साजरी केली.
यावेळी या सर्व कामगारांना दिवाळी फराळाच्या कीटचे वाटप करण्यात आले. गुरूवारी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर माजी महापोैर मा. महंम्मदभाई पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे चिरंजीव श्री.आझमभाई पानसरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत या अनोख्या उपक्रमाला सुरुवात केली.