शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महे लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास गणपत कुटे आणि डॉ. सुनील वानखेडे (मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल) यांच्या विद्यमानाने एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, मोफत नेत्रचिकित्सा शिबीर आणि मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नेत्र शिबिराचे उद्घाटन केले. सदाशिव डुंबरे मामा यांच्या हस्ते दानवे साहेबांना सन्मानित करण्यात आले. कोकन मित्र अध्यक्ष जयराम काका मोरे यांनी आभार मानले. चंद्रकांत गळगट्टी व श्री.दिलीप गोसावी हे उपस्थितीत होते.
कैलास गणपत कुटे यांच्या जनसंपर्क कार्यालय श्री.रावसाहेब दानवे यांनी आकुर्डी येथील नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले व दीपावलीच्या शुभेच्छा ही दिल्या. तसेच या कार्यक्रमामध्ये डॉ.गणेश शिंदे, डॉ.अमोल शिंदे, डॉ. निलेश चांभार, डॉ.शेख हे देखील उपस्थित होते.या शिबिरामध्ये शेकडो नागरिकांचे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नाव नोंदविण्यात आले, तसेच या शिबिरामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला.