शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
सर्वत्र दिवाळी हा सण आनंदाने साजरा होत आहे. भारतीयांसाठी दिवाळी हा अति महत्वाचा सण म्हणून मानला जातो. या निमित्तानेच सर्व भारतीय हा दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. दिवाळी हा सण कोणा एका धर्माचा नसून सर्वधर्मीय नागरिक हा दिवाळी सण आनंदाने साजरा करतात. या दिवाळी सणाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरातील युवा नेते विशाल बारणे यांनी एक अनोखा उपक्रम राबविला, मोफत आकाश कंदील कार्यशाळा यानिमित्ताने आयोजित करण्यात आली.
या मोफत आकाशकंदील कार्यशाळेमध्ये लहान मुलांना आकाश कंदील बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेत अनेक लहान, मोठ्या मुलांनी, मुलींनी सहभाग घेतला. व आकाश कंदील बनवण्याचा आनंद लुटला. दिवाळी सणानिमित्त लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आनंद तसेच या कार्यशाळेत आकाश कंदील बनविण्याची कला मुलांना अवगत झाली. त्याबद्दलचा उत्साह मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. या कार्यशाळेबाबत युवा नेते विशाल बारणे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, दिवाळी सणानिमित्त प्रत्येक घरासमोर ते घर एखाद्या गरिबाचे घर असो, किंवा एखाद्या श्रीमंताचे घर असो, त्या घरासमोर आपण आकाश कंदील लावत असतो. हे आकाशकंदील बाजारात छोट्या-मोठ्या किमतीत मिळतात. परंतु जर हे आकाश कंदील घरच्या घरी बनवता आले तर बाजारात मिळणारे आकाश कंदील साठी पैसे मोजावे लागणार नाही. या संकल्पनेतून आपण हे उपक्रम राबविले या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक लहान मुला मुलींनी आकाश कंदील बनवण्याची कला अवगत केली व अनेकांच्या घरात या कार्यशाळेचे अंतर्गत तयार झालेले आकाश कंदील या दिवाळी सणाच्या निमित्ताने लावण्यात आले. युवा नेते विशाल बारणे यांच्या या उपक्रमाचे अनेक स्तरातून कौतुक होत आहे. असेच सामाजिक उपक्रम आपण यापुढेही राबविणार असल्याचे युवा नेते विशाल बारणे यांनी यावेळी सांगितले.