दिनेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व कामाचा लेखाजोखा अहवाल स्वरूपात प्रकाशन सोहळा संपन्न
पिंपरी चिंचवड :- स्वीकृत सदस्य पिंपरी चिंचवड शहर महानगरपालिका तसेच भारतीय जनता युवा मोर्चा सरचिटणीस पिंपरी-चिंचवड शहर मा. श्री दिनेश लालचंद यादव यांच्या वाढदिवसा निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला,
दिनेश यादव यांनी आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली कुदळवाडी परिसरात नागरिकांच्या हिताची अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत या कार्याचा लेखाजोखा या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त कार्यअहवाल रूपाने प्रकाशित करण्यात आला कार्य अहवालाचे प्रकाशन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
सामाजिक ,राजकीय ,विविध क्षेत्रातील, विविध योजना,विविध उपक्रम, गुणगौरव समारंभ, सर्वसामान्यांच्या अडी-अडचणी, विविध प्रश्न,व कुदळवाडी चिखली भागातील केलेल्या कामाचा लेखाजोखा अहवाल या कार्यअहवाल प्रकाशित करण्यात आला आहे
यावेळी या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेते पदाधिकारी आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या