शबनम न्यूज | नवी दिल्ली
भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक रविवारी दिल्लीमध्ये झाली. भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही, हाच इतर राजकीय पक्षांमध्ये आणि भाजपमध्ये ठळक फरक आहे. सेवा, संकल्प आणि समर्पणाची वृत्ती हाच भाजपचा आधार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत केले.
ते म्हणाले की, माणसाला ज्ञान केवळ पुस्तकांतून मिळत नाही. लोकांमध्ये राहून काम केल्याने कार्यकर्ता समृद्ध होत असतो. भाजपने आज केंद्रात जे स्थान प्राप्त केले आहे, त्यामागे सामान्य व्यक्तीबद्दल बांधिलकीच आहे. १०० कोटी कोरोना प्रतिबंधक डोसच्या उद्दिष्टपूर्तीबद्दल पक्षाचे अध्यक्ष जे. पी . नड्डा यांनी पंतप्रधान मोदींचा सत्कार केला . भाजपने कोरोना महामारीच्या काळात सर्वांना सहकार्य केले . जगभरातही भारत माहात्म्य अधोरेखित झाले . भाजपच्या निःस्वार्थ कार्यकर्त्यांची जीवनगाथा ‘ नमो ॲप’च्या माध्यमातून जगासमोर आणायला हवी , अशी अपेक्षाही मोदींनी व्यक्त केली . गृहमंत्री अध्यक्ष नड्डांसह सर्व वरिष्ठ नेते बैठकीत सहभागी होते. ज्येष्ठ नेते अमित शहा, लालकृष्ण अडवाणी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक सहभाग नोंदविला . नड्डा म्हणाले की , कोरोनाच्या काळात मोदींनी घेतलेल्या धाडसी निर्णयांचा अर्थव्यवस्था सावरण्यात मोठा फायदा झाला.
शेतकऱ्यांसाठी वाढीव १ लाख कोटींची तरतूद बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की , २०१४ मध्ये जेव्हा आमचे सरकार आले तेव्हा शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये फक्त २३ हजार कोटी रुपये खर्चाची तरतूद होती . आमच्या सरकारमध्ये गतवेळी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी १ लाख २३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.