शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
एका महिलेसोबत प्रेमाचे नाटक करत लग्नाचे आमिष दाखवून एचआयव्ही बाधित व्यक्तीने वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच तीला मारहाण आणि पैशाची मागणी करत फसवणूक केली आहे. सप्टेंबर 2020 ते ॲाक्टोबर 2021 दरम्यान संतोषी माता चौक पिंपरी, देहूरोड, गोवा आणि तिरुपती बालाजी या ठिकाणी ही घटना घडली आहे. याबाबत पिडीत महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार संतोष शंकर गोरे ( वय 51, राहणार आळंदी पुणे) अनिल दिनकर शिंदे ( वय -62, राहणार नारायणगाव पुणे) या आरोपींविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2020 ते ऑक्टोबर 2021 च्या दरम्यान आरोपी संतोष याने पिडीत फिर्यादी महीलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारिरिक संबंध ठेवुन बलात्कार केला. आरोपी संतोष हा एचआयव्ही या गंभीर आजाराने ग्रस्त असताना त्याने त्या महिलेपासून लपवून ठेवत कोणत्याही सुरक्षेच्या साधनाशिवाय तिच्याशी शरीर संबंध ठेवून त्या महिलेच्या जिवास धोका निर्माण होईल असे कृत्य केले. तसेच लग्नाबाबत विचारले असता पैशाची मागणी करून पिडीत फिर्यादी महिलेला मारहाण आणि शिवीगाळ केली. आरोपी अनिल याने पिडीत फिर्यादी महिलेला याबाबत कुठेही तक्रार केली तर तिला व तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली .आरोपी अद्याप फरार असून अधिक तपास महिला पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे करित आहेत.