शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदार व अधिकार्यांवर कारवाई करा, अशी मागणी नगरसेवक योगेश बहल यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने महापालिकेचे विविध रुग्णालयांना मेडिकल पॅरामेडिकल कर्मचारी पुरविणेबाबत निविदा (क्र. १०/२०२१-२२) प्रसिद्ध केली होती. या निविदेमध्ये सहभागी झालेल्या श्री कृपा सर्विसेस प्रा. लि. या ठेकेदाराने महापालिकेला खोटी कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याबाबत चे प्रकरण मी आपल्या निदर्शनास आणून दिलेले आहेत. सदर ठेकेदाराकडे निविदेतील अनुभवाची अट पूर्ण करण्याबाबत कोणताही अनुभव नसताना संबंधितांनी अनुभवासाठी साई मेडिक्युअर सर्व्हिसेस प्रा.लि. यांचे वरळी येथील साई हॉस्पिटल प्रा. लि. यांचे कोंढवा येथील लाईफ लाईन हॉस्पिटल, आळेफाटा येथील चैतन्य हॉस्पिटल, चेंबूर येथील आरोग्य केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मेडिकल पॅरॉमेडिकल कर्मचारी पुरविल्याचा अनुभवाचा बोगस दाखल जोडला आहे.
सदर दाखले हे पूर्णत बोगस असून ते चार अनुभवाचे दाखले जोडले आहेत. त्या कोणत्याही संस्थेला श्री कृपा सर्विसेस यांनी मनुष्य बळ पुरविले नाही. आम्ही त्याबाबत खातरजमा करून या बोगसगिरी चे सर्व पुरावे आपल्याला उपलब्ध करून दिल्यानंतरही महिनाभरापासून त्या ठेकेदारावर कारवाई करण्यात दिरंगाई करून त्यास पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू आहे. महापालिका प्रशासनातील काही अधिकारी व सत्ताधारी भाजपाच्या नेतेमंडळी चे आर्थिक हित साधण्यासाठी केलेला हा गंभीर प्रकार झाकण्याचा प्रकार सुरू असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. याबाबत मी आपणास वारंवार पत्रव्यवहार करून तसेच स्मरण पत्र देऊन महापालिकेची फसवणूक करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याबाबत विनंती केली आहे. या नंतरही सुरू असलेली दिरंगाई अत्यंत गंभीर व फौजदारी कारवाईस पात्र ठरणार आहे.
श्री कृपा सर्विसेस 4 कंपनी हे अनुभवाचे दाखले जोडलेले आहेत. त्याबाबत कोणताही व्यवहार झालेला नाही श्री कृपा सर्विसेस ने दाखविलेल्या अनुभवानुसार त्यांनी त्यांच्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये त्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. अथवा ज्यांनी अनुभव असे दाखले जोडले आहेत. त्यांच्याही इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये याबाबत नोंदी नाहीत. व कामगार कल्याण विभागाकडे याबाबत कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसून वरील करारनामे व्यवहारात पोटी शासकीय कार्यालयांमध्ये कोणतीही माहिती आढळून येत नाही. तसेच अनुभवाचे दाखले जोडण्यात आलेले आहेत. ते एका संगणकावर बनविण्यात आल्याचे दिसून येत असून एकाच प्रिंटर भरून त्याची प्रिंट काढल्या की, आम्ही आपल्या निदर्शनास आणून दिले आहे. महापालिकेची फसवणूक करण्याचा व निविदा प्रक्रियेद्वारे आर्थिक विकास साधण्याच्या हेतूने ही कागदपत्रे सादर केलेले आहेत. यामध्ये महापालिकेच्या काही अधिकार यांचाही सहभाग असल्याचे समोर येत आहे. श्री कृपा सर्विसेस ने वरील चार संस्थानाचे मनुष्य बळ पुरविले त्यांच्या नावाची पत्ता व फोन क्रमांकासह यादी शैक्षणिक प्रमाणपत्र वेतन अदा केल्याचे दाखले, बँक स्टेटमेंट, डॉक्टरांची जीएसटी भरले याचे दाखले, आया, वॉर्डबॉय यांचे पीएफ,इएसआईसी हे देखील आम्ही आपल्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र आपण त्याबाबत महिनाभरात कोणतीही कारवाई केलेली नसल्याचे दिसून येत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या ठेकेदाराची चौकशी करण्याऐवजी महापालिकेची फसवणूक केल्याची बक्षिसे म्हणून या ठेकेदाराला आरोग्य विभागातील कोट्यावधींची रस्ते साफसफाईचे काम देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि क्लेशदायक आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत या ठेकेदाराला नवीन कोणतेही काम देऊ नये, तसेच वैद्यकीय विभागाने जे मनुष्यबळ पुरवठ्याचे काम दिले आहे. त्याबाबत कोणतेही बिल अदा करण्यात येऊ नये, चौकशी पूर्ण होण्यापूर्वी आपण कोणतीही रक्कम अदा केल्यास सदर रक्कम याची जबाबदारी आयुक्त या नात्याने आपली राहील याची आपण नोंद घ्यावी.
महापालिकेचे खोट्या कागदपत्रांद्वारे फसवणूक करणे हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा प्रकार असल्याने महापालिका आयुक्त या नात्याने आपण त्यावर तात्काळ कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र आपण कोणतीही कारवाई न करता भाजपाच्या दबावाखाली आपण काम करत असल्याचे यावरून दिसून येत आहे. ही बाब महापालिकेच्या सन्मानाला ठेच पोहोचविणारी असून भ्रष्टाचार करणारे अधिकारी व ठेकेदार पाठीशी घालणारे ठरत आहे. आपणास या पत्राद्वारे स्पष्ट करू इच्छितो की, महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार तसेच भारतीय दंड विधानातील फौजदारी कलमानुसार आपण पुढील आठ दिवसात महापालिकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून काळ्या यादीत न टाकल्यास आपण विरोधात उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली जाईल. या संपूर्ण भ्रष्टाचार आणि बोगस केलेला आपण पाठीशी घालत असल्यामुळे आपणासही प्रतिवादी करण्यात येईल. तसेच या प्रकरणी पोलिसांकडे ही तक्रार नोंदविण्यात येईल यानंतर होणाऱ्या कोणत्याही परिणामास आपण आयुक्त या नात्याने जबाबदार रहाल याची नोंद घ्यावी, असेही सदर निवेदनात नगरसेवक योगेश बहल यांनी नमूद केले आहे.