शबनम न्युज | पिंपळे सौदागर
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
आज पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिराशेजारील असलेल्या पवना नदीच्या घाटावर नाना काटे सोशल फौंडेशन व उत्तर भारतीय क्षत्रिय समाज यांच्या वतीने उत्तर भारतीय नागरिकांचा पवित्र असणाऱ्या छठपूजेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी राज्य सरकारने दिलेल्या कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून प्रत्येक नागरिकांना मास्क लाऊन,सॅनिटायजरचा वापर करून व सोशल डीस्टेन्स पाळून मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा करण्यात आला.
महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेता तथा विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शितलताई नाना काटे यांच्या हस्ते छठपूजन करण्यात आले.यावेळी उत्तर भारतीय नागरिकांच्या वतीने पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश,सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे,पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे,नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे,नगरसेवक विनोद नढे यांचा सन्मान करण्यात आला व सन्माननीयांनी उत्तर भारतीय नागरिकांना छठ पूजा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी उत्तर भारतीय नागरिक मंडळाचे ब्रिजेश सिंग,दुर्गेश सिंग,श्री.राकेश गुप्ता ,अमरजित सिंग,श्याम सिंग,सुनीलकुमार सिंग,उमेश सिंग,सारंग सिंग,कान सिंग शेखावत,अमित सिंग इत्यादी नागरिक उपस्थित होते.
छटपूजा उत्सव उत्तर भारतामध्ये कार्तिक मास शुक्ल पक्षाच्या चतुर्थी पासून सप्तमी पर्यंत चार दिवस छटपूजा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.पहिल्या दिवशी वृत्त करणारे प्रथम स्नान करून नवीन कपडे परिधान करतात.या दिवशी भोपळा,भात,चना डाळ यापासून शाकाहारी भोजन बनवले जाते.दुस-या दिवशी निरंकार उपवास करून सूर्याची पूजा केली जाते.आणि उसाचा रस किंवा गुळ टाकून तांदळाची खीर करून त्यात तूप टाकून त्याची रोटी बनवतात व या रोटीचा प्रसाद तयार केला जातो.त्यानंतर ३६ तासांचा निरंकार उपवास असतो.तिस-या दिवशी प्रसाद बनवला जातो आणि सजवलेल्या टोपलीतून सायंकाळी घाटावर घेवून जातात. व्रत्त करणारे सदस्य पाण्यात उभे राहून मावळत्या सूर्याला अर्घ्य देतात.चौथ्या दिवशी सकाळी उगवत्या सूर्याला नदीत पाण्यात उभे राहून अर्घ्य देवून सूर्यदेवाला घरामध्ये सुख शांती लाभावी यासाठी आराधना करून प्रसाद वाटून छट पुजेची समाप्ती केली जाते.