शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
स्वातंत्रता सेनानी स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री, काँग्रेसचे मा.राष्ट्रीय अध्यक्ष,भारतरत्न अब्दुल कलाम आझाद यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाने मोफत वाचनालय उभारण्यात यावे, यासाठी पिं.चिं मनपा आयुक्त मा. राजेश देशमुख देशमुख साहेब व अतिरिक्त आयुक्त मा. ढाकणे साहेब यांना शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे वतीने निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मा. राजेंद्र सिंग वालिया व शहराध्यक्ष मा.शहाबुद्दीन शेख यांनी निवेदन दिले.
याप्रसंगी मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक समितीचे अध्यक्ष अजहर खान, शहर सरचिटणीस व्ही. एम. कबीर, युवक उपाध्यक्ष वसीम शेख,सामाजिक कार्यकर्ते जमीर शेख, नियाज देसाई, अब्दुल जाफर मुल्ला आदी उपस्थित होते.