शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षण प्रसारासाठी थोर स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण केला त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते अजहर खान, नियाझ देसाई, जाफर मुल्ला, शहाबुद्दीन शेख, नवाज शेख, इम्रान बिजापुरे, महंमदअली सय्यद, रुहिनाज शेख, कलिंदर शेख उपस्थित होते.
भारताचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून काम करताना त्यांनी शोषित समूहाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले प्रयत्न सदैव स्मरणात राहतील असेही महापौर माई ढोरे म्हणाल्या.
सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप यांनी देखील पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.