ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड होणार टी 20 वर्ल्ड कप फायनल
टी 20 वर्ल्ड कप क्रिकेट सामना आज पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया चांगलाच रंगला, ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले व पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करत एकूण 176 धावसंख्या उभारली, या धावसंख्येचा पाठलाग करत ऑस्ट्रेलियाने आपले 05 गडी गमावत धावसंख्या पूर्ण केली या सामन्यात पाकिस्तानचा मोठा पराभव झाला आहे पाकिस्तान वतीने कप्तान बाबर आजम याने 39 धावसंख्या उभारली तर प्रथम फलंदाजीला आलेला मोहम्मद रिजवान याने 69 धावसंख्या उभारली तसेच धडाडीचा फलंदाज शोएब मलिक एक धावसंख्या वरच दुर्दैवाने बाद झाला, ऑस्ट्रेलिया वतीने फलंदाजी करताना पहिल्याच चेंडूत ऑस्ट्रेलियाचा कप्तान फिंच बाद झाला त्यानंतर येणाऱ्या फलंदाजांनी चांगली बाजू सांभाळली व एकोणीस षटकात धावसंख्या पूर्ण करीत 177 धावा बनविले आता t20 वर्ल्ड कप अखेरचा सामना 14 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड असा होणार आहे
संपूर्ण मालिकेत पाकिस्तानला आतापर्यंत कोणीही हरवलेले नव्हते, परंतु या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात पाकिस्तानला आखेर हार मानावी लागली.
ऑस्ट्रेलियाने भारताचा बदला घेतला व पाकिस्तान संघाला हरवले असे आता भारतीय क्रिकेट प्रेमींच्या वतीने सांगण्यात येत आहे.*