शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पक्षांतील अल्पसंख्याक अध्यक्षांच्या वतीने भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या १३३ व्या जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये त्यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्याचे आली. व प्रत्येकाने त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले. व शहरात मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावे सांस्कृतीक भवन उभारणीची मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विषय पुर्णत्वास नेण्याची मागणी यावे प्रशासनाकडे केली.
या कार्यक्रमास प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे पिं.चिं.मनपाचे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके,स्थायी समिती सदस्य.सुजाताताई पालांडे, माजी उपमहापौर..तुषार हिंगे, माजी उपमहापौर.मा.महंम्मदभाई पानसरे,माजी नगरसेवक.रामअधार धारिया,भाजपा अल्पसंख्याक अध्यक्ष.फारूकभाई इनामदार,RPI वहातुक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष.अजीज शेख,रा.कॉं.अल्पसंख्यांक अध्यक्ष.युसुफ कुरेशी, शिवसेना अल्पसंख्याक अध्यक्ष.हाजी दस्तगीर मनियार, कॉंग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष.शाबुद्दीन शेख, कॉंग्रेस अल्पसंख्याक सरचिटणीस.कबीर मोहम्मद,भाजपा अल्पसंख्याक सरचिटणीस.अमरजी खुराणा,रा.कॉं.अल्पसंख्याक उपाध्यक्ष.मा.शहाजी अत्तार,रा.कॉं.अल्पसंख्यांक उपाध्यक्ष.मा.नासीरभाई शेख,मा.आयतुल्ला सय्यद,मा.कासीमभाई सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.