शबनम न्युज | मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे. अशी माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ.अजित देसाई आणि डॉ.शेखर भोजराज यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काल (दि.११) रोजी मानेच्या त्रासाने व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून रुग्णालयात दाखल झाले होते. आज त्यांच्यावर सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर असल्याचे एच. एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी सांगितले आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 12, 2021