शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्र. 28 रहाटणी पिंपळे सौदागर येथे झाडे सुशोभिकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. जवळ जवळ 800 ते 900 वड-पिंपळाची झाडे बापु काटे यांच्या सांगण्यावरून संपुर्ण प्रभागात लावलेली आहेत.
यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्र. 28 रहाटणी पिंपळे सौदागर अधिकाधिक विकसित करणे आणि सुशोभित करण्याचे काम पालिकेकडून हाती घेतले आहे. यामध्ये प्रभाग २८ मधील रस्ते सुध्दा सुशोभित करण्यात यावेत. यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आज प्रभागातील कोकणे चौक ते जगताप डेअरी चौक दरम्यानच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या झाडांना इको फ्रेंडली रंगाने ज्याचा झाडावर कसल्याही प्रकारचा परिणाम होत नाही अशा रंगाचा वापर करून रंग रंगोटी करण्यात आली.
यामुळे रस्त्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. येत्या काही दिवसात रहाटणी पिंपळे सौदागर मधील परिसरात किवा रस्त्याच्या कडेला असणारे झाडे यांना देखील अश्याच प्रकारे रंग रंगोटी देवून सुशोभीकरणाचे काम करण्यात येणार आहे असे नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे यांनी सांगितले.