शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ नोव्हेंबर ) :- संस्कार भारती पिंपरी- चिंचवड समिती बाल विभाग चित्रकला विधा आणि कॅमलिन कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आज बाल दिनाचे औचित्य साधून चिंचवड येथील जिजाऊ पर्यटन केंद्र येथे बालदिन विशेष चित्रकला स्पर्धा 9 ते 12 वर्षे व 13 ते 16 अश्या दोन वयोगटात आयोजित करण्यात आली होती,पिंपरी चिंचवड शहरातून एकूण 240 बाल स्पर्धकांनी यात उस्फुर्त भाग घेतला.
यावेळी संस्कार भारतीच्या बाल विभाग व चित्रकला विधेच्या नेटक्या संयोजन आणि सहकार्यामुळे सदर स्पर्धा खूप देखणी आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.
यावेळी ऐनवेळी सांगण्यात आलेल्या विषयांवर चित्र काढताना मुलांच्या मधील सुप्त प्रतिभा दिसून आली, अतिशय सुंदर कलाकृती मुलांनी रेखाटलेल्या होत्या, यावेळी डि. वाय. पाटील कॉलेज ऑफ ॲप्लाईड आर्टस चे प्राध्यापक श्री नितिन तावरे, कलारंजन आर्ट इन्सटिटयूटचे अध्यक्ष श्री.श्याम साठे, संस्कार भारती चे अध्यक्ष श्री सचिन काळभोर, उपाध्यक्ष श्री हर्षद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ झाला.विजेत्यांना संस्कार भारती आणि कॅम्लिन कंपनी यांच्या वतीने संस्कारक्षम पुस्तिका, तुळस, कॅम्लिन सेट, आणि ट्रॉफी प्रशस्तीपत्र देण्यात आले.
स्पर्धेचे विजेते :-स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे –
गट- अ) 9 ते 12 वर्षे
प्रथम – वैष्णवी उके.
व्दितीय – मृदुल झामरे.
तृतीय – अनिरुध्द वाघ.
उत्तेजनार्थ – सर्वेश दिक्षित.
गट – ब) 13 ते 16 वर्षे
प्रथम – शाम कुलकर्णी.
व्दितीय – अनन्या देशपांडे.
तृतीय – भक्ती पाटील.
उत्तेजनार्थ- नचिकेत बारपांडे.
दिव्यांग गटात विशेष – अंकुर खंडागळे.
स्पर्धेच्या मध्यंतरी मुलांना खाऊ वाटप करण्यात आले सोबत संस्कार भारती ची माहिती श्री.हर्षद कुलकर्णी यांनी सांगितली, यावेळी कलाश्री नृत्यालय ची विद्यार्थिनी कु.ऐश्वर्या चौधरी हिने भरतनाट्यम नृत्यातून गणेश वंदना सादर केली व नाट्य विधेतर्फे विधा प्रमुख श्री किरण जी येवलेकर आणि प्रसन्न कुलकर्णी यांनी मुलांसोबत गमती जमती करत गप्पा गोष्टी केल्या.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बाल विभाग प्रमुख सौ सायली काणे, सचिव सौ.लीना ताई आढाव, चित्रकला विधा प्रमुख श्री प्रफुल्ल भिष्णूकर, सहप्रमुख श्री चिन्मय बहुलेकर, सौ.वर्षा अर्धापुरकर, सौ अश्विनी बहुलेकर, सौ अस्मिता गुरव, श्री किरण काळे, श्री.भाग्येश अवधानी, श्री.मोहित पवार, श्री.रुपकांतजी जोशी, कु.सेजल जोशी, सौ सरिका सूर्यवंशी, अंजली देशमुख, सौ अंजली साळी, देवेंद्र देशमुख, प्रज्ञिक भिष्णूकर, सिद्धी भालेकर, प्रणित आढाव श्री रमेश खडबडे रांगोळी विधेच्या सौ गौरी करांडे, सौ अनिता रोकडे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.